Thursday, December 12, 2024 07:45:12 PM

Manipur
अतिरेक्यांनी केला रॉकेट हल्ला

मणिपूरमध्ये हिंदू मैतेई समाजावर कुकी अतिरेक्यांनी रॉकेट डागून हल्ला केला.

अतिरेक्यांनी केला रॉकेट हल्ला

इंफाळ : मणिपूरमध्ये हिंदू मैतेई समाजावर कुकी अतिरेक्यांनी रॉकेट डागून हल्ला केला. या घटनेमुळे राज्यातील मैतेई समाज दहशतीत आहे. हमास ही अतिरेकी संघटना इस्रायलमध्ये ज्यू समाजाला लक्ष्य करुन रॉकेट हल्ले करते. याच पद्धतीने कुकी अतिरेक्यांनी हिंदू मैतेई समाजावर रॉकेटद्वारे हल्ला केला. कुकी अतिरेक्यांकडे रॉकेट आणि इतर आधुनिक, संहारक शस्त्रास्त्रे कुठुन आली आणि किती प्रमाणात आहे ? हा प्रश्न चर्चेत आहे. मणिपूर सरकारने रॉकेट हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती राज्यपालांना दिली आहे. केंद्रीय गृह खात्याच्या संपर्कात राहून मणिपूर सरकार राज्यात ठिकठिकाणी धाडी टाकत आहे. पोलिसांनी कुकींचे आधुनिक शस्त्रसाठे शोधून जप्त करण्यास सुरुवात केली आहे. पण अतिरेक्यांकडे नेमका किती शस्त्रसाठा आहे आणि तो कुठे लपवला आहे ? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo