नाशिक : अंतरवलीमधील दगडफेकीमागे आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे होते. लाठीमारावेळी मनोज जरांगे हजर नव्हते. पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना आणून बसवलं. मराठा आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला. उद्धव आणि पवारांना ही वस्तुस्थिती माहिती नव्हती; असे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी संतापून प्रतिक्रिया दिली. म्हातारपणात पापाचा डाग लावून घेऊ नको, असे जरांगे म्हणाले. पोलिसांनी लाठीमार केला त्यावेळी पळालो असल्यास चौकशी करावी, असेही जरांगे म्हणाले. जरांगेंच्यानंतर रोहित पवारांचीही प्रतिक्रिया आली. रोहित पवारांनी भुजबळांचे आरोप फेटाळले. चौकशी करा आणि आरोप सिद्ध करा, असे आव्हान रोहित पवारांनी भुजबळांना दिले.