Wednesday, February 18, 2026 05:28:12 PM

Rohit Shetty House Firing : रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?; पुण्यातून चौघे ताब्यात

रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारानंतर तपास यंत्रणांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

rohit shetty house firing  रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन पुण्यातून चौघे ताब्यात

Rohit Shetty House Firing Case : बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळातूनही चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी या संदर्भात अत्यंत गोपनीयता बाळगत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणांहून 4 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे मनोरंजन विश्वातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पुणे पोलिसांची धडक कारवाई
रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारानंतर तपास यंत्रणांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी शहरातील वारजे आणि कर्वेनगर परिसरात सापळा रचला होता. या मोहिमेत पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीनंतर या चौघांनाही मुंबई गुन्हे शाखेच्या (Crime Branch) स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात आणि उपनगरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर मध्यरात्री गोळीबार; फक्त गोळीबारच नाही तर…; जुहू परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

कुख्यात गँगशी संबंध आणि बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचे कनेक्शन
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ताब्यात घेतलेले चारही संशयित देशातील एका अत्यंत कुख्यात गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात ज्या गँगचा सहभाग होता, त्याच गँगचे हे सदस्य असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिद्दिकी हत्याकांडातील आरोपींच्या संपर्कात हे तरुण होते का आणि रोहित शेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना या गँगकडून रसद पुरवण्यात आली होती का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर बॉलीवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याची ही नवी पद्धत समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातूनही चिंता व्यक्त होत आहे.

मनोरंजन विश्वात दहशतीचे वातावरण
रोहित शेट्टी हे बॉलीवूडमधील एक बडे नाव असल्याने त्यांच्या घरावर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक शत्रुत्वातून आहे की अंडरवर्ल्डच्या धमक्या आणि कारस्थानांचा भाग आहे, यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या या 4 जणांच्या पार्श्वभूमीचा आणि त्यांच्या मोबाईल कॉल्सचा सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणी आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा -  Pune Crime : कोयता गँगमध्ये आता महिलेची एन्ट्री; त्या रस्त्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ


सम्बन्धित सामग्री