उत्तरप्रदेश : कुंभमेळ्यात संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळाला भक्तिमय वातावरणात उत्साहात सोमवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरूवात झाली. गंगा, यमुना आणि लुप्त झालेल्या सरस्वतीच्या संगमावरील घनदाट धुके, कडाक्याची थंडी आणि शरीर गोठावणारे थंड पाणी.. अशा वातावरणात प्रयागराज येथे भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्साहात मंगळवारी शाहीस्नान झालं गेल्या दोन दिवसात पावणेदोन कोटी भाविकांनी संगमावर पवित्र स्नान केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट
भारतीय मूल्ये आणि संस्कृती प्रिय असलेल्या कोट्यवधी लोकांसाठी अतिशय विशेष दिवस आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात होत आहे.
त्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम पाहायला मिळतेय.
दर 12 वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळाला आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. प्रयागराजमध्ये सोमवारी पोर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या कुंभमेळाचा योग राशींनुसार 144 वर्षांनी आल्याचा दावा साधूसंतांनी केला आहे. पुढील असा योग थेट 22 व्या शतकात येणार आहे.
हेही वाचा : महाकुंभात अखंड भारताचे चिदानंद सरस्वतींनी केले आवाहन
काय आहे कुंभमेळ्याचा योग
वेदात म्हटल्यानुसार देव आणि दानवांच्या समुद्रामंथनानंतर कुंभमेळाची सुरूवात झाली. अमृतकुंभ घेवून पक्षाने 12 दिवसात पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृतकुंभातून चार थेंब पृथ्वीवर पडल्याची कथा आहे. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळाचे आयोजन केले जाते. चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याबाबत पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत. शंकराचार्यांनी खगोलीय स्थिती लक्षात घेतली, सर्व तारे एका रेषेत येतात तेव्हा कुंभमेळा होतो.
हेही वाचा : मकरसंक्रांतीनिमित्त चाफळच्या श्रीराम मंदिरात महिलांची गर्दी
तीर्थराज प्रयागराजमध्ये सूर्योदयापूर्वी मकर संक्रांतीच्या पवित्र सणावर महाकुंभनगरीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देश-विदेशातील करोडो लोक गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर अमृत स्नान करण्यासाठी पोहोचले. पवित्र स्नानाचा हा देखावा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा विश्वास दर्शवत होता. ब्रह्म मुहूर्तावरच, विविध आखाड्यांच्या साधूसंतांनी आणि देशभरातील भक्तांनी पवित्र गंगा नदी आणि संगम काठावर श्रद्धेने स्नान केले आणि आनंद, आरोग्य आणि समृद्धीची कामना केली. संपूर्ण परिसरात भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे वातावरणात भक्तांच्या जयघोषाने वातावरण अधिकच दिव्य बनले होते.