Russia on Kashmir : जम्मू काश्मीरचा मुद्दा वारंवार उपस्थित करून कुरापत काढण्याच्या पाकिस्तानच्या सवयीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा खाली मान घालण्याची वेळ आली आहे. अनेक देशांनी पाकिस्तानचा अपमान करूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. यावेळी रशियाने पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली आहे.
काश्मीरच्या मुद्द्यावर रशियाची भूमिका पहिल्यांदाच इतकी स्पष्टपणे समोर आली आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलवर बोलताना रशियाचे पाकिस्तानमधील राजदूत अल्बर्ट खोरेव यांनी पाकिस्तानला रोखठोक शब्दांत सुनावले आहे. रशियाने म्हटले आहे की, काश्मीरच्या प्रश्नावर फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो आणि तिसऱ्या कोणत्याही देशाने यामध्ये हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही.
एका पाकिस्तानी अँकरने नुकतेच आपल्या टीव्ही चॅनलवरील एका कार्यक्रमात पाकिस्तानमधील रशियन राजदूत अल्बर्ट खोरेव यांना सहभागी केले होते. त्यावेळी अँकरने राजदूतांना काश्मीरच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला.
हेही वाचा - India China Relations: चीनचा भारतावर थेट हल्ला, WTOमध्ये दाखल केली तक्रार, इलेक्ट्रिक वाहन धोरणावरून वाद पेटला
अँकरने विचारले की, "भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे काश्मीरचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. भारताच्या या भूमिकेमुळे काश्मीरचा मुद्दा अण्वस्त्र हल्ल्यांपर्यंत पोहोचू शकतो का? यावर तुमचे काय मत आहे?" या प्रश्नाला रशियाच्या राजदूतांनी थेट उत्तर देऊन पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितले. रशियाने म्हटले, "माझ्या मते, काश्मीरचा मुद्दा हा फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाऊ शकतो. या मुद्द्यावर तिसऱ्या कोणत्याही देशाने हस्तक्षेप करू नये." पुढे बोलताना त्यांनी हेही स्पष्ट केले की, भारताने यावर जी भूमिका मांडली आहे, तीच भूमिका आमची देखील आहे.
भारताची भूमिका
जम्मू काश्मीरबाबत भारताने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्यावर कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर कधीच चर्चा होणार नाही. आता फक्त प्रश्न आहे तो पाकव्याप्त काश्मीरचा (PoK). त्यावर द्विपक्षीय चर्चा केली जाईल. मात्र, त्यामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाला हस्तक्षेप करता येणार नाही, अशी भारताची ठाम भूमिका आहे. रशियाने याच भूमिकेला पाठिंबा देऊन पाकिस्तानला मोठा राजकीय आणि कूटनीतिक झटका दिला आहे.
हेही वाचा - India USA Relations: अमेरिकेचा भारतावर नवा आरोप, रशियाकडून तेल खरेदीवर पुन्हा वादंग