मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एक व्यक्ती ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून, सैफच्या घरातून एक वडिलोपार्जित तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सैफच्या शरीरावर असलेल्या जखमेतील ब्लेडचा तुकडा देखील पोलिसांनी पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे. सैफ आणि त्याची पत्नी करीना कपूर यांचा जबाब आजच नोंदवला जाण्याची शक्यता आहे.
16 जानेवारी रोजी सैफ अली खान यांच्या घरावर हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी सैफच्या घरात घुसून त्यावर शारीरिक हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या पाठीत गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यात एक ब्लेडचा तुकडा डॉक्टरांनी काढला होता. पोलिसांनी हा तुकडा पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे.
तलवार ताब्यात घेतली : सैफच्या घरातून एक जुनी वडिलोपार्जित तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी या तलवारीच्या बाबतीत अधिक तपास सुरू केला आहे. या तलवारीचा संबंध हल्ल्याशी असू शकतो, असे पोलिसांचे मत आहे.
चोराच्या घुसखोरीचे प्रकरण : वांद्रे पश्चिमेतील एक इमारत देखील चोरांनी लक्ष केलं. चोराने इमारतीतील गार्ड आणि मालकाला धमकावले आणि नंतर पोलिसांना फोन केल्यावर अर्ध्या तासात पोलीस आले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याची तक्रार इमारती मालकाने केली आहे. चोराला सोडून दिल्यानंतर तो परत येऊन इमारतीतील सिसिटीव्ही कॅमेरे तोडून गेला.
👉👉 हे देखील वाचा : सैफ अली खानच्या संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आली समोर
सैफ अली खानच्या हल्ल्याचा तपास : सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला पोलिसांनी वेग दिला आहे. आज सैफ आणि करीना कपूर यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. सैफच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांचे देखील पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत.
सैफ अली खानवर हल्ला करणारा चोरटा वसई विरारच्या दिशेने पलायन झाला आहे. वांद्रे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोराची छायाचित्रे कैद झाली आहेत, ज्यांच्या साहाय्याने पोलिस त्याचा मागोवा घेत आहेत. पोलिसांचे पथक वसई विरारमध्ये तपास करत असून, गुन्हे शाखेचे सूत्र सांगतात की वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नाहीत. मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची माहिती गुन्हे शाखेला पाच तासांनी मिळाली आणि सीसीटीव्ही फुटेज व डिव्हीआर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. पोलिस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवादामुळे तपासावर फटका बसला आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.