Saturday, October 12, 2024 09:43:28 PM

Maharashtra
राज्यातील वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांना पगारवाढ

राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली.

राज्यातील वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांना पगारवाढ

मुंबई : राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही वाढ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे.

कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात वाढ केल्यामुळे आता राज्यातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी. ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही फडणवीस म्हणाले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo