Saturday, January 18, 2025 06:05:34 AM

Sambhajinagar Ahmedabad flight service adjourned
संभाजीनगरातून 1 डिसेंबरपासून अहमदाबाद विमानसेवा स्थगित

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा विमानतळावरून 1 डिसेंबरपासून अहमदाबाद विमानसेवा काही काळासाठी इंडिगोने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाजीनगरातून 1 डिसेंबरपासून अहमदाबाद विमानसेवा स्थगित

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा विमानतळावरून 1 डिसेंबरपासून अहमदाबाद विमानसेवा काही काळासाठी इंडिगोने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बंगळुरूची विमानसेवा आठवड्यातून 4 ऐवजी 3 दिवस केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, नागपूर, लखनऊ, अहमदाबादसाठी विमानसेवा आहे. त्यापैकी अहमदाबादचे विमान बंद होत आहे. इंडिगोची हैदराबाद आणि मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा आहे. लखनऊ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-गोवा विमान मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे आठवड्यातून 3 दिवस आहे.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात छत्रपती संभाजीनगर ते अहमदाबाद विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. इंडिगो कंपनीच्या या निर्णयामुळे विमानसेवेला फटका बसू शकतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ चौथ्या स्थानावर आहे. एका खासगी कंपनीने त्यांच्या आकडेवारीमध्ये तसे नमूद केले आहे. छत्रपती संभाजीनगरात 6 लाख 23 हजार 915 इतक्या लोकांनी 2023-24 या वर्षी विमान प्रवास केला आहे.

 

महाराष्ट्रात गतवर्षी किती लोकांनी विमान प्रवास केला ?

महाराष्ट्रात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळ हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ आहे. जिथून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. 52 कोटी 8 लाख 20 हजार प्रवाशांनी मुंबईतून विमान प्रवास केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विमानतळ आहेत. पुण्यातून 9 कोटी 52 लाख 5 हजार 484 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. तिसरा क्रमांक नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 2 कोटी 79 लाख 4 हजार 427 प्रवाशांनी नागपूरमधून प्रवास केला आहे.छत्रपती संभाजीनगरात 6 लाख 23 हजार 915 इतक्या लोकांनी 2023-24 या वर्षी विमान प्रवास केला आहे.


सम्बन्धित सामग्री