Sunday, February 16, 2025 12:00:58 PM

SAMBHAJINAGAR MURDER NEWS
"तू एकटक का पाहतोस?", "तू कॉलर का उडवतोस?" म्हणून हत्या...

19 वर्षीय बीसीएस विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या

quotतू एकटक का पाहतोसquot quotतू कॉलर का उडवतोसquot म्हणून हत्या 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे (वय 19) या विद्यार्थ्याची अज्ञात हल्लेखोरांनी निघृण हत्या केली.

प्रदीपच्या हत्येमागे महाविद्यालयात झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शनिवारी महाविद्यालयातील काही मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादावेळी "तू एकटक का पाहतोस?", "तू कॉलर का उडवतोस?" अशा कारणांवरून वादविवाद होऊन हाणामारी झाली होती.

👉👉 हे देखील वाचा : सुरेश धस राजीनामा देणार. पण...

संक्रांतीच्या रात्री प्रदीपचे मित्र बाहेर गेले असताना मारेकऱ्यांनी फ्लॅटमध्ये घुसून त्याची गळा चिरून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 11:30 वाजता उस्मानपुऱ्यात उघडकीस आली.

प्रदीप मूळचा माजलगाव येथील असून देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो आपल्या एका मावसभाऊसह अन्य तीन मित्रांसोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता.

मंगळवारी सर्व जण महाविद्यालयातून फ्लॅटवर परतले होते. सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते, परंतु प्रदीप मात्र फ्लॅटवर थांबला होता. रात्री 10 वाजता त्याचे भाऊ आणि मित्र परतले, तेव्हा त्यांनी प्रदीपला गळा कापलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत मृत पाहिले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक सखोल चौकशी केली जात आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री