मुंबई : पवार घराण्याच्या जवळचे मानले जाणारे नवाब मलिक सध्या राष्ट्रवादीत आहेत. नुकतीच नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून वडिलांऐवजी मुलीला उमेदवारी जाहीर केली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्यापासून सना मलिक सातत्याने राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या त्यांच्या वडिलांची जबाबदारी सांभाळत आहेत आणि नवाब मलिक यांची सर्व कामे पाहतात. ३६ वर्षीय सना मलिक यांची अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी आहे.अणुशक्ती नगर जागेबाबत बोलायचे झाले तर येथे सुरुवातीपासून नवाब मलिक यांचे वर्चस्व आहे. गेल्या विधानसभा कार्यकाळापासून सना मलिक येथे सक्रिय आहे आणि वडिलांचे काम पाहत आहे.