Monday, February 17, 2025 01:50:27 PM

Sanjay Raut statement
Sanjay Raut: स्वबळाच्या नाऱ्यानंतर राऊतांचे स्पष्टीकरण

सद्या सर्वत्र चर्चा सुरूय ती म्हणजे महाविकास आघाडीच्या फुटीची. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर ही चर्चा जोरदार सुरूय.

sanjay raut स्वबळाच्या नाऱ्यानंतर राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई: सद्या सर्वत्र चर्चा सुरूय ती म्हणजे महाविकास आघाडीच्या फुटीची. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर ही चर्चा जोरदार सुरूय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईसह पुणे, ठाणे आणि नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यांच्या याच वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय म्हणाले संजय राऊत? 
“काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकायला हवं. त्यांनी ऐकण्याची पण सवय लावायला हवी. एखाद्याचं म्हणणं ऐकणं मोठी गोष्ट असते. मी फक्त एवढंच म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वांनी इंडिया आघाडी बनवली, विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडी बनवली.आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. 

ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपण निवडणूक लढवावी. जर तीन-चार पक्ष मिळून निवडणूक लढवत असतील तर कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. लोकसभा अन् विधानसभा निवडणूक वेगळी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर पक्षाचा विस्तार होऊ शकतो. आमचं निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही इंडिया आघाडी फुटली किंवा महाविकास आघाडी फुटली असं म्हटलं नाही. 

आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली आहे. त्यामुळे कुणाला मिरच्या झोंबण्याचं काही कारण नाही. सगळ्यांना आपल्या पार्टीचा विचार करण्याचा हक्क असतो. असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. 


 


सम्बन्धित सामग्री