बीड: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही. यासंदर्भात आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात येणारे. वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार. त्यात आता कराडला दुपारी केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता
वाल्मीक कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळते, हे पहावे लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
त्याचबरोबर आरोपींना फाशी होईपर्यंत थांबणार नाही असं सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणालेत. सकाळी 10 वाजेपर्यंतचं त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. उद्यापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण गाव आंदोलन करणार असल्याचं देखील समोर आलाय. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा देखील दिलाय. त्याचबरोबर आरोपींना फाशी होईपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख म्हणालेत.
पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं होत. अखेर 4 तासानंतर धनंजय देशमुखंनी आंदोलन मागे घेत वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
काय आहेत देशमुख कुटुंबाच्या मागण्या?
मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा
वाल्मिक कराडवर मकोका लावावा
सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेशिंदेंची नियुक्ती करावी
सीआयडीचा तपास कुठवर आला याची माहिती देशमुख कुटुंबाला द्यावी
एसआयटीमध्ये अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नेमणूक तातडीनं करावी
फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करुन सहआरोपी करावं