Friday, March 13, 2026 10:09:24 PM

Satara ZP Election Winner List 2026: साताऱ्याचं 'मिनी मंत्रालय' कोणाचं? 65 गटांचा फैसला आज

मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, टप्याटप्याने येणाऱ्या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

satara zp election winner list 2026 साताऱ्याचं मिनी मंत्रालय कोणाचं 65 गटांचा फैसला आज

Satara ZP Election Winner List 2026 : सातारा जिल्ह्याचे 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेसाठीची मतमोजणी आज, 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 65 गटांसाठी आणि 130 पंचायत समिती गणांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. साताऱ्यातील 21,94,110 मतदारांपैकी तब्बल 14,87,554 मतदारांनी म्हणजेच 67.80% मतदारांनी आपला हक्क बजावला असून आता सर्वांचे लक्ष विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे लागले आहे.

राजकीय समीकरणं आणि प्रतिष्ठेची लढाई
साताऱ्यात परंपरेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत असे. 2012 आणि 2017 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले होते. मात्र, यावेळेस भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर (विमान अपघात) बदललेल्या राजकीय परिस्थितीत शरद पवार आणि अजित पवार समर्थक दोन्ही राष्ट्रवादी गट सातारा जिल्हा परिषदेसाठी एकत्रितपणे लढले आहेत. भाजपच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

हेही वाचा - Karad Election Result : कराड समिती निवडणुकीत धक्कादायक प्रकार; रेनकोटमध्ये मोबाईल नेणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडलं

निकाल आणि दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा
जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण आणि पाटण यांसारख्या महत्त्वाच्या तालुक्यांत काट्याची लढत पाहायला मिळत आहे. मंत्री शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, टप्याटप्याने येणाऱ्या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत साताऱ्याचा नवीन कारभारी कोण असेल, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.

हेही वाचा - Zilla Parishad Election 2026: सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर कारवाई; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


सम्बन्धित सामग्री