पुणे : पुण्यात भारतीय जनता पक्ष विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले. आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. अपहरण झाल्यानंतर आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. त्यानांतर पुण्यातील निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह सापडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
नेमकं घडलं काय?
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे सकाळी मांजरी येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जाताच चार ते पाच जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात बसवले. आणि त्यांचं अपहरण केलं. जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ कुटूंबियांना याबाबत माहिती दिली. जवळपास पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचे अपहरण झाले. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात आता पुणे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे असे या आरोपींचे नाव असल्याचं समोर आलं आहे. शर्मा नावाच्या व्यक्तीसह काही जण ताब्यात असल्याचं देखील समोर आलं आहे . भारतीय जनता पक्ष विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण झाल्यानंतर खून झाल्याचे समोर आले. यानंतर पुणे पोलिसांच्या 16 टीम आरोपींचा शोध घेत होते. यानंतर आता पुणे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे असे या आरोपींचे नाव असल्याचं समोर आलं आहे.