Saturday, February 15, 2025 06:41:22 AM

Shasan Aplya Dari Yojna
‘शासन आपल्या दारी’ला स्कॉच पुरस्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘शासन आपल्या दारी’ला स्कॉच पुरस्कार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून या उपक्रमावर परीक्षकांनी शिक्कामोर्तब केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने हा उपक्रम वर्षभरात पाच कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचविला. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात १५ मे २०२३ रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात झाला. प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीत ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री