बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचं स्टारडम हे भाषा, राष्ट्रआणि पिढीच्या पलीकडे आहे. या अभिनेत्याने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जगभरात एक अतुलनीय चाहता वर्ग निर्माण केला आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, माय नेम इज खान आणि चेन्नई एक्सप्रेससारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह शाहरुख जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात ओळखण्यायोग्य चेहऱ्यांपैकी एक बनला आहे. 2024 मध्ये, त्याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. शाहरुखने अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. मात्र फॉरेनमधील एका क्विझ रिअॅलिटी शोमध्ये शाहरुख खानचे प्रोफेशन कोणते, असा प्रश्न स्पर्धकाला विचारला असात, त्याचे अजबच उत्तर देण्यात आले आहे. या प्रश्नासंबंधीत शोचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Actress Shocking Revelation: ‘पोस्ट करण्यापूर्वीही भीती वाटते; माझ्यावर अत्याचाराचा प्रयत्न...’ धुरंधर फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर?' या फॉरमॅटवर आधारित एका परदेशी क्विझ शोमध्ये एका स्पर्धकाला विचारण्यात आले की, "अब्जाधीश शाहरुख खान कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वात जास्त ओळखला जातो?". सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फिल्म अॅक्टिंग, मोटर रेसिंग आणि प्रोफेशनल पोकर हे पर्याय होते. या स्पर्धकाने "सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट" हा पर्याय निवडला. ही क्लिप लवकरच व्हायरल झाली. ज्यामुळे सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रिया उमटल्या. त्याला सिग्नेचर स्टाईलमध्ये हात पसरवताना पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी उत्तर स्पष्ट होते. मात्र त्या स्पर्धकाच्या उत्तराने सारेच चकीत झाले.