Monday, February 17, 2025 12:41:29 PM

Amit Shah
भाजपा अधिवेशनातून शाह यांचा पवार आणि ठाकरेंवर निशाणा

भारतीय जनता पार्टीचे शिर्डीत अधिवेशन झाले.

भाजपा अधिवेशनातून शाह यांचा पवार आणि ठाकरेंवर निशाणा

शिर्डी : भारतीय जनता पार्टीचे शिर्डीत अधिवेशन झाले. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, जे.पी.नड्डा आणि मंत्री नितीन गडकरी आदी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अधिवेशनाला हजर राहिले. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांचे भाजपा नेत्यांकडून स्वागत झाले. अमित शाह यांनी शरद पवारांनी नेहमी दगाफटक्याचं राजकारण केलं असल्याची टीका पवारांवर केली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

तुम्ही पवारांचं दगाफटक्याचं राजकारण दफन केलं. पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडलं असं म्हणत त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची जागा दाखवली अस म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी जहरी टीका केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्याचं काम तुम्ही केलंत केलं असे म्हणत शाह यांनी फडणवीस सरकारचे स्वागत केले.

 

शरद पवार-ठाकरेंना जनतेनं घरी बसवलं. खरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही विजय झाला. एकनाथ शिंदेंची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : पर्यटन मंत्रालयाकडून महाकुंभ 2025 साठी प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ

2019मध्ये उद्धव ठाकरेंनी मविआसोबत जात महायुती तोडली होती. त्यावर शाह यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. बाळासाहेबांचे विचार सोडले. उद्धव ठाकरे धोकेबाज आहे असा टोला शाहांनी लगावला आहे. ठाकरे दगाफटका करुन मुख्यमंत्री बनले होते. घराणेशाही करणाऱ्यांना चपराक दिली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला.

गृहमंत्री अमित शाह यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भाष्य केले. भाजपाला स्थानिक निवडणुकांची तयार करण्यासाठी कानमंत्र दिला. तसेच कुणीही विश्वासघात करू शकणार नाही, असा मजबूत पक्ष बनवा बनवण्याचेही सांगितले.

 

 


सम्बन्धित सामग्री