Saturday, February 08, 2025 02:49:00 PM

Shahajibapu Patil
झाडी पण गेली, डोंगर पण गेला

सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला.

झाडी पण गेली डोंगर पण गेला

सांगोला : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. महाराष्ट्रात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक पार पडली. सांगोला विधानसभा  मतदारसंघात महायुतीकडून शहाजीबापू पाटील यांना उमेदवार देण्यात आली होती. मात्र सांगोला मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील उमेदवार होते. त्यांच्या विरूद्ध मविआचे उमेदवार  दीपक साळुंखे उभे होते. शहाजीबापू पाटील विरूद्ध दीपक साळुंखे विरूद्ध डॉ. बाबासाहेब देशमुख अशी तिरंगी लढत होती. सांगोल्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचा विजय न होता शेकापने बाजी मारल्याचे पाहायला मिळते. शेकाप पक्षाच्या बाबासाहेब देशमुख यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

 

कोण आहेत शहाजीबापू ?

सांगोला विधानसभा मतदारसंघात आमदार राहिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी करत आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. त्या आमदारांमध्ये शहाजीबापू पाटीलही होते. त्यावेळी काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल असा उद्गार शहाजीबापू यांनी निसर्ग बघून केला. त्यांनी काढलेले उद्गार माध्यमांमधून चर्चेला आले.    

 

 

 


सम्बन्धित सामग्री