मुंबई : राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पवारांनी आठ दिवसांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही भेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगला येथे झाली. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणत्या विषयावर काय चर्चा झाली हे अद्याप समजलेले नाही.
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर काही दिवसांनी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. शरद पवारांनी आठ दिवसांत दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.