राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज, बुधवारी सकाळी 8.45 मि. नी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजित पवार यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 1 मि. 42 सेकंदाचा एक व्हिडिओ जारी केला असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन देखील केले आहे. शरद पवार म्हणाले की, हा निव्वळ अपघात असून कोणताही घातपात नाही. या अपघाताला राजकारणाशी संबंध जोडू नये. राज्याची कधीही न भरून निघणारी ही हानी आहे. असे सांगताना शरद पवार यांचाही कंठ दाटून आला होता. त्यांच्या बोलण्यातली भावविवषता स्पष्ट दिसून येत होती.
हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash: हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग; टीव्हीवर बातमी झळकली अन् आशाताई लेकाला भेटण्यासाठी अनवाणी...