दर शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद असतात, तर दिवाळीसह काही सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही ते बंद असतात. देशभरातील इतर आस्थापनांप्रमाणे, या सणासाठी बीएसई आणि एनएसईवर व्यवहार बंद राहतील. मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार थोड्या काळासाठी खुला राहील. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे 20 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजार चार दिवस बंद राहील.
दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग सत्र NSE आणि BSE वर 21 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. एका तासासाठी म्हणजे दुपारी 1.45 ते 2.45 पर्यंत सुरु राहणार आहे. याव्यतिरिक्त, दुपारी 1.30 ते 1.45 पर्यंत प्री-ओपन सेशन असेल, ज्यामुळे व्यापाऱ्यांना ट्रेडिंगची तयारी करता येईल. हा मुहूर्त ट्रेडिंग सेशन गुंतवणूकदारांसाठी एक शुभ काळ मानला जातो.
हेही वाचा - Nirmala Sitharaman On GST Cut: 'नफेखोरांवर कारवाई करणार'; GST कपातीनंतर निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
या विशेष सत्रात, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही गेल्या 16 वर्षांपैकी 13 वेळा वाढीसह बंद झाले आहेत. दिवाळी 2024 च्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात, सेन्सेक्स 335.06 अंकांच्या वाढीसह 79,724,.12 वर बंद झाला आणि निफ्टी 99 अंकांच्या वाढीसह 24,304,35 वर बंद झाला.
हेही वाचा - ITR Portal Update: ई-फायलिंग पोर्टलवर नवी सुविधा! आता करदात्यांना कळणार 'ही' महत्त्वाची गोष्ट
कोणत्या क्षेत्रांमध्ये ट्रेडिंग करता येते
इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज कर्ज देणे आणि कर्ज घेणे यासह विविध विभागांमध्ये व्यापार शक्य होईल.