Friday, February 07, 2025 11:20:51 PM

SHIVSENA VS UDHAV SENA
'चादर पाठवली, साडी चोळी का नाही?' उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा सवाल

अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ८१३ व्या उरुसनिमित्त चादर अर्पण

 चादर पाठवली साडी चोळी का नाही उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा सवाल 

मुंबई : विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला होता. या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या अस्तित्वासाठी महापालिका निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, म्हणूनच उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीसाठी धोरण आखण्यासाठी तयारी करत आहेत.

उद्धव ठाकरे यांचे आगामी निर्णय महापालिकेच्या निवडणुकीतून त्यांच्या पक्षाच्या पुनरुत्थानासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने ते मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. यामध्ये, पक्षाने महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढावे, अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या मागण्या ऐकून, आगामी रणनीतीवर चर्चा करण्याचा विचार करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

शिवसेना (उबाठा) च्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका आणि त्यावर घेतलेल्या गोष्टींचा पावलांचा आढावा घेण्याचे सुरू आहे. याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ८१३ व्या उरुसनिमित्त चादर अर्पण केली. यावेळी पक्षनेते विनायक राऊत, उपनेते नितीन नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "उबाठा ने अजमेरला चादर पाठवली पण कधी कोणत्या मंदिरात देवीला साडी चोळी पाठवली, असं काही ऐकण्यात किंवा पाहण्यात आहे का कुणाच्या?" असा सवाल त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आगामी रणनीती आणि महापालिका निवडणुकीतील यशावर पक्षाचे भविष्य अवलंबून आहे.


सम्बन्धित सामग्री