Shetkari Karjmafi 2026 Farmer Documents List : राज्य शासनाच्या प्रस्तावित 'शेतकरी कर्जनिवारण योजना 2026' च्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रशासकीय पातळीवर वेगाने काम सुरू आहे. नागपूर विभागासह राज्यभरात थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाने आता अशा शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर केली असून तातडीने कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले आहे.
माहिती अभावी पोर्टलवर नोंदणी रखडली
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी संस्थांमार्फत सध्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती (Farmer Loan Waiver Documents List) गोळा केली जात आहे. परंतु, हजारो शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक, बचत खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर उपलब्ध नसल्यामुळे योजनेच्या अधिकृत पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे शक्य होत नाहीये. अनेक शेतकरी गाव सोडून स्थलांतरित झाले आहेत, तर काही कर्जदार शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये बँक खात्यांची माहिती अद्ययावत नसल्याने योजनेची अंमलबजावणी खोळंबली आहे.
याद्या कुठे तपासायच्या?
ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांच्या नावाच्या याद्या प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. शेतकरी ही माहिती खालील ठिकाणी जाऊन तपासू शकतात:
- आपल्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था.
- नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा.
- ग्रामपंचायत कार्यालय.
- पंचायत समिती किंवा तहसील कार्यालय.
- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय.
हेही वाचा - Namo Shetkari Yojana Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार; तारीख समोर
मयत कर्जदारांच्या वारसांना विशेष आवाहन
विभागीय सहनिबंधकांनी स्पष्ट केले आहे की, जे मूळ कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत, त्यांच्या कुटुंबाला या योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. मात्र, त्यासाठी त्यांच्या वारसांनी संबंधित बँकेच्या शाखेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. वारस नोंदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तातडीने बँकेत जमा केल्यास, संबंधित कुटुंबाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी
नागपूरचे विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांनी सांगितले की, विभागातील एकही पात्र शेतकरी या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ज्यांचे नाव यादीत नाही किंवा माहिती अपूर्ण आहे, त्यांनी विनाविलंब आपले आधार कार्ड आणि बँक तपशील अद्ययावत करावेत. फेब्रुवारी 2026 महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून पुढील काळात कर्जमाफीचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करता येईल.
हेही वाचा - Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना! हार्वेस्टर खरेदीसाठी सरकारकडून मिळणार मोठी मदत