Wednesday, February 18, 2026 07:53:29 AM

Navi Mumbai Mayor Election : संख्याबळ नसतानाही शिंदे गट महापौरपदाची निवडणूक लढणार, महायुतीत पुन्हा वाद होण्याची चिन्हं

navi mumbai mayor election  संख्याबळ नसतानाही शिंदे गट महापौरपदाची निवडणूक लढणार महायुतीत पुन्हा वाद होण्याची चिन्हं

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदांसाठी आज भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने आपले अर्ज दाखल केले. भाजपातर्फे सुजाता सुरज पाटील आणि उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज दाखल केले. तर शिवसेना शिंदे गटदेखील संख्याबळ नसताना महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढविणार आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे महापौरपदासाठी सरोज पाटील तर उपमहापौरपदासाठी आकाश मढवी यांनी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा : CM Devendra Fadanvis : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक, अट घालून केली राष्ट्रवादीची पंचाईत

नवी मुंबई महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक असून आणि भाजपकडे 65 नगरसेवक आहेत. एका अपक्षाच्या पाठिंब्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या 66 झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे 42  नगरसेवक आहेत, शिवसेना (उबाठा) दोन आणि मनसेकडे एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी लागणारा 56 हा आकडा भाजपने गाठला असून 5 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडेल.


सम्बन्धित सामग्री