मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभाचा धडाका उडाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात २ तर कोल्हापुरात ३ अशा मिळून पाच सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून शिवसेना उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू झाला आहे.