Tuesday, December 10, 2024 10:31:03 AM

shiv-sena-campaign-launch-mumbai
शिवसेनेच्या प्रचाराचा मुख्यमंत्री शिंदे फोडणार नारळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी ते कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा घेणार आहेत.

शिवसेनेच्या प्रचाराचा मुख्यमंत्री शिंदे फोडणार नारळ
manojteli
manunile

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी ते कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा घेणार आहेत. संध्याकाळी कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या समर्थनार्थ पहिली जाहीर प्रचार सभा होईल. यानंतर रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात दुसरी सभा होणार आहे, जिथे मुख्यमंत्री शिंदे शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. या सभांमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा संचारेल. मुख्यमंत्री शिंदे यांची भाषणं विरोधकांवर तिखट प्रहार करतील, ज्यामुळे आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती दिसून येत आहे.  

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo