Sunday, February 09, 2025 04:27:50 PM

Shiv Sena VS BJP
महायुतीत नव्या वादाची ठिणगी

'खरी शिवसेना ठाकरेंची, शिंदेंनी पक्ष चोरला' भाजपात आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

महायुतीत नव्या वादाची ठिणगी

मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं. त्यावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. मात्र, तरीही त्याबाबतच्या राजकीय आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी सुरूच असतात. ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी खरी शिवसेना ठाकरेंचीच असा दावा केला आहे. भाजपा प्रवेशानंतर माजी नगरसेवकांनी केलेल्या दाव्यानं महायुतीत नव्या वादाला सुरूवात होणार आहे.

माजी नगरसेवकांचा आरोप
सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदेंच्या शिवसेनेला निवडणुकीत यश मिळाले असल्याने शिंदे यांना लोकाश्रय मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र, मूळ शिवसैनिक असलेले माजी नगरसेवक भाजपात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

महायुतीत वादाची ठिणगी पडणार?
पुण्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. माजी नगरसेवकांच्या मते, शिंदे यांनी पक्ष चोरला आणि खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

यांच्या आरोपानुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या साथीने शिवसेनेत फूट पाडली. भाजपाच्याच राजाश्रयाने पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या पदरात पडलं आहे. माजी नगरसेवकांच्या आरोपानुसार, शिंदे यांच्या बंडाला मूळ साथ भाजपाची होती.

भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांची पक्षाविरोधी भूमिका
भाजपात राहून शिंदे यांच्यावर आरोप करणे, महायुतीतील वादाला नव्या फोडणी देणार आहे. यावर अद्याप शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तरीही, यावरून महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगणार, हे निश्चित आहे.

ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र

👉👉 हे देखील वाचा : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विविध विभागांची आढावा बैठक


 


सम्बन्धित सामग्री