Tuesday, December 10, 2024 11:38:06 AM

Mumbai
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा

जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटवस्तू वाटपावरुन राडा झाला.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा

मुंबई : जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटवस्तू वाटपावरुन राडा झाला. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. ठाकरे सेनेचे निवडक कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी मातोश्री क्लब येथे गेले, त्यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केले. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. गुन्हा घडल्याचे ठोस पुरावे हाती आल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo