अमरावती : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेतील जखमींची काँग्रेस नेते व खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रीती मोरे यांना त्यांनी जखमी रुग्णांवर गतीने वैद्यकीय उपचार करावे तसेच योग्य त्या वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचना देखील केल्या...