रायगड : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना रायगडमधील कर्जत मतदारसंघात उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. कर्जत मतदार संघातील उद्धव सेनेचे नेते सुरेश टोकरे, भाई शिंदे आणि डॉ. सुनिल पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सुरेश टोकरे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. तर भाई शिंदे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. डॉक्टर सुनिल पाटील हे जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक तसेच मराठा समाज समन्वयक तथा माजी खोपोलीचे नगराध्यक्ष सुनिल पाटील आहेत. हा प्रवेश सोहळा सोमवारी संध्याकाळी कर्जत येथे पार पडला.