संगमनेर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी आली आहे. विखे पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. ताफ्यातील पोलिस गाडीचा अपघात झाला. या पोलिस गाडीने एका वाहनाला धडक दिली. ही घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात घडली. या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुखरुप आहेत.