Sunday, April 20, 2025 05:47:31 AM

VIDEO : पाण्यात उभं राहून मजेत फोटो काढत होता; तेवढ्यात पायाला काहीतरी लागलं.. बघतो तर काय.. हातात आली मगर..

एक माणूस नदीत आंघोळ करायला गेला, मग त्याला पाण्यात काहीतरी विचित्र वाटले, त्याने पाण्यात हात घातला तेव्हा मगर बाहेर आली, याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

video  पाण्यात उभं राहून मजेत फोटो काढत होता तेवढ्यात पायाला काहीतरी लागलं बघतो तर काय हातात आली मगर

Man Grabs Crocodile Viral Video : अनेक लोकांना नद्या आणि तलावांमध्ये पोहायला आवडते, परंतु पाण्याखाली लपलेल्या धोक्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. समजा, तुम्ही नदी किंवा तलावात पोहायला गेलात आणि मजा करत फोटो आणि व्हिडिओ काढले. नंतर पाण्यात डुंबण्याच्या विचारात असतानाच, अचानकपणे तुमच्या हाताला किंवा पायाला काहीतरी खरखरीत स्पर्श झाला तर, काय होईल? अंगावर काटा उभा राहील आणि आपसूक काय आहे, ते पाहण्यासाठी आपण हात त्या बाजूला नेऊ.. असा पद्धतीने हाताने स्पर्श करून ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि मगर हातात आली तर..?
अशाच एका घटनेत, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एका माणसाचा मगरीशी झालेला भयानक सामना पाहून लोकांना धक्का बसला आहे. नदी किंवा तलावात मौज-मजा करत डुंबत असताना तुम्हाला आढळले की, पाण्यात काहीतरी आहे आणि जेव्हा, तुम्ही हाताने स्पर्श करून ती वस्तू काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तुम्ही चुकून तरी अशी कल्पना कराल का, की पुढच्या क्षणी हातात मगर येईल?

हेही वाचा - बायकोनं गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं.. मग नवऱ्यानं काय केलं? पोहताही येत नसताना तलावात उडी मारली..! पाहा VIDEO

एक माणूस नदीत आंघोळ करायला गेला, मग त्याला पाण्यात काहीतरी विचित्र वाटले, त्याने पाण्यात हात घातला तेव्हा मगर बाहेर आली, याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या माणसाला पाण्यात पायाशी काहीतरी आल्याची जाणीव होते. तो खाली वाकून काय आहे, ते पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ती वस्तू हातात घेऊन पाहिल्यानंतर त्याच्या पोटात भीतीने गोळा येतो.. आणि तो एका झटक्यात पळ काढतो..

या धक्कादायक व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तलावात असल्याचे दिसून येते. त्याचा सहकारी तो मौज-मजा करत असल्याचे रेकॉर्डिंग करत आहे. तेवढ्यात पाण्यात असलेल्या व्यक्तीला अचानक पाण्याच्या आत काहीतरी जाणवते. तो वाकून हात पाण्याखाली नेतो आणि मग हात वर करताच त्याची गाळणच उडते.. ओय..ओय.. करून ओरडत तो कसाबसा धडपडत नावेत येऊन पडतो.

काय घडला प्रकार?
हा व्हिडिओ पोस्ट करताना, कॅप्शनमध्ये लिहिले आहे- भयानक फेस-ऑफ! मीडिया लुनाच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहणाऱ्या एका माणसाचा आहे. त्याला मजेत पाण्यात डुंबताना कसा मगरीचा सामना करावा लागला, ते या व्हिडिओत दिसत आहे. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असलेल्या या व्यक्तीसाठी, हा अनुभव काही क्षणातच एका भयानक अपघातात बदलला. हा माणूस बोटीतून पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचे दृश्य टिपणाऱ्या या व्हिडिओत या माणसाने अचानक एका मगरीला स्पर्श केला, जी मगर कदाचित त्याला चावली असती.

जेव्हा अचानक पाण्यात मगर आढळली
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती पाण्यात मजा करताना दिसत आहे. त्याचा मित्र बोटीतून त्याचा व्हिडिओ बनवत होता. अचानक, त्या माणसाला पाण्यात काहीतरी विचित्र वाटले. जेव्हा त्याने पाण्याबाहेर हात काढला तेव्हा लोक थक्क झाले... त्याच्या हातात एक मगरीचे पिल्लू होते! त्या माणसाला त्याच्या हातात काय आहे हे कळताच त्याने लगेच मगरीच्या पिल्लाला पाण्यात फेकून दिले. भीतीने तो ओरडत बोटीकडे धावला आणि कसा तरी त्याचा जीव वाचवला.

हेही वाचा - Reel साठी वाट्टेल ते! धोकादायक स्टंट करताना झालं असं काही.. चालत्या ट्रेनच्या खिडकीत लटकला... व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप


सम्बन्धित सामग्री