Monday, February 17, 2025 12:53:18 PM

Shooting At School In Sweden
Shooting At School In Sweden: स्वीडनमधील ओरेब्रो शहरातील प्रौढ शिक्षण केंद्रात गोळीबार; हल्लेखोरासह 10 जणांचा मृत्यू

स्वीडनमधील एका प्रौढ शिक्षण केंद्रात झालेल्या गोळीबारात बंदूकधारी व्यक्तीसह सुमारे 10 जण ठार झाले. परंतु, मृतांची अंतिम संख्या आणि जखमींची निश्चित संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.

shooting at school in sweden स्वीडनमधील ओरेब्रो शहरातील प्रौढ शिक्षण केंद्रात गोळीबार हल्लेखोरासह 10 जणांचा मृत्यू
स्वीडनमधील गोळीबारात 10 जणांचा मृत्यू
Edited Image

Shooting At School In Sweden: मंगळवारी मध्य स्वीडनमधील एका प्रौढ शिक्षण केंद्रात झालेल्या गोळीबारात बंदूकधारी व्यक्तीसह सुमारे 10 जण ठार झाले. परंतु, मृतांची अंतिम संख्या आणि जखमींची निश्चित संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. गुन्ह्याच्या ठिकाणी झालेले नुकसान इतके मोठे होते की, तपास अधिक निश्चितपणे सांगू यासंदर्भात माहिती देऊ शकत नाहीत, असे स्थानिक पोलिस प्रमुख रॉबर्टो ईद फॉरेस्ट यांनी सांगितले. स्टॉकहोमपासून सुमारे 200 किमी पश्चिमेला असलेल्या ओरेब्रो शहराच्या बाहेरील भागात ही गोळीबाराची घटना घडली. 

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्वीडनची राष्ट्रीय कार्यदल घटनास्थळे पोहोचली आहे. दरम्यान, पोलिसांनी सार्वजनिक सूचना जारी केल्या असून रहिवाशांना सुरक्षिततेसाठी घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वीडिश वृत्तसंस्था टीटीने वृत्त दिले आहे की, गोळीबार करणाऱ्या आरोपीने घटनेनंतर आत्महत्या केली. प्रौढ शिक्षण केंद्र ओरेब्रो शहरात आहे, जे स्टॉकहोमपासून सुमारे 200 किमी पश्चिमेला आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की हिंसाचारात कोणत्याही अधिकाऱ्यांना गोळी लागली नाही. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस आणि इतर आपत्कालीन वाहने दिसत आहेत. विद्यार्थी जवळच्या इमारतींमध्ये आश्रय घेत होते. गोळीबारानंतर शाळेचा इतर परिसर रिकामा करण्यात आला. न्यायमंत्री गुन्नार स्ट्रॉमर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'ओरेब्रोमध्ये हिंसाचाराचे वृत्त खूप गंभीर आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तेथे बचावकार्य जोरात सुरू आहे. सरकार पोलिसांशी जवळून संपर्कात असून घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.' 

गोळीबार शाळेच्या (इमारतीच्या) आत झाला की इतरत्र झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या शाळेत हा गोळीबार झाला त्या शाळेत 20 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक शिक्षण घेतात. या शाळेचे नाव कॅम्पस रिसबर्गस्का आहे. या प्रकरणी पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांचे विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा संपूर्ण स्वीडनसाठी खूप दुःखाचा दिवस आहे. 


सम्बन्धित सामग्री