Saturday, February 15, 2025 05:23:08 AM

Shrinivas Vanga
वनगा रात्री परतले, पुन्हा घरातून निघून गेले

श्रीनिवास वनगा रात्री घरी परतले आणि काही तासांतच पुन्हा अज्ञातस्थळी निघून गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.

वनगा रात्री परतले पुन्हा घरातून निघून गेले

पालघर : शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती. पण ही संधी हातून गेल्यामुळे ते निराश झाले. उमेदवारी मिळत नाही याची खात्री झाल्यावर आधी घरातच खुर्चीत बसून ढसाढसा रडलेले नंतर मोबाईल बंद करुन चालत घराबाहेर पडले आणि एकटेच अज्ञातस्थळी निघून गेले. पुढील काही तास त्यांच्याशी कोणाचाही संपर्क झाला नाही. रात्री उशिरा श्रीनिवास वनगा घरी परतले. काही तासांनंतर ते निवडक मित्रांसोबत पुन्हा अज्ञातस्थळी निघून गेले. यामुळे श्रीनिवास वनगा नेमके काय करत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीनिवास वनगा रात्री घरी परतले आणि काही तासांतच पुन्हा अज्ञातस्थळी निघून गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. 

कोण आहेत श्रीनिवास वनगा ?

श्रीनिवास वनगा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर पालघर मतदारसंघातून विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत वनगा कायम त्यांच्यासोबत राहिले. पण २०२४ च्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी वनगांना उमेदवारी नाकारली.


सम्बन्धित सामग्री