Tuesday, November 18, 2025 09:03:50 PM

Influencers : आता सोशल मीडियावर 'फुकटचे सल्ले' देता येणार नाहीत! इन्फ्लुएन्सरना सरकारनेच लावला लगाम

सोशल मीडियावरील भ्रामक माहिती, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला अटकाव करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

influencers  आता सोशल मीडियावर फुकटचे सल्ले देता येणार नाहीत इन्फ्लुएन्सरना सरकारनेच लावला लगाम

Social Media New Rules : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मोठा झटका बसला आहे. अनेक युट्यूब चॅनल्स आणि रील्समध्ये इन्फ्लुएन्सर (Influencers) रोज फुकटचा सल्ला देत असतात, पण त्यांना त्या विषयातील खरोखर ज्ञान आहे की नाही, यावर आता सरकारने जालीम उपाय केला आहे. चीनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे भरमसाठ पीक आलेले आहे आणि त्यांच्या सल्ल्याने अनेकांच्या जीवनात विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले होते. ही बाब लक्षात घेत, चीनच्या कम्युनिस्ट सरकारने आता या फुकटचा सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरचा लगाम लावला आहे.

सल्ला देण्यासाठी व्यावसायिक पदवी आवश्यक
डॉक्टर, वकील, औषधी आणि आर्थिक सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरला चीन सरकारने थेट दणका दिला आहे. 25 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालेल्या या नियमानुसार, असा सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएन्सरकडे त्या विषयातील ज्ञान किंवा व्यावसायिक पदवी (Professional Degree) नसेल, तर त्याला सल्ला देता येणार नाही. म्हणजेच, यापुढे कोणालाही या संबंधित क्षेत्रात 'हिरोगिरी' किंवा 'चमकोगिरी' करता येणार नाही.

नियमावली: चीनमधील सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना (Cyberspace Administration of China) या संस्थेने ही नियमावली तयार केली आहे.
उद्देश: सोशल मीडियावरील भ्रामक माहिती, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला अटकाव करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा - EV Car Viral Video : दीड लाखांच्या ई-रिक्षाने ओढली 15 लाखांची टाटा नेक्सॉन EV; व्हिडिओ व्हायरल

प्लॅटफॉर्म्स आणि क्रिएटर्सना काय करावे लागणार?
या नवीन नियमांमुळे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (Social Media Platforms) आणि ॲप्स यांना त्यांच्या इन्फ्लुएन्सरची सत्यता, ज्ञान, वकूब आणि व्यावसायिक पदवी तपासणी (Verification) करावी लागणार आहे.
क्रिएटर्ससाठी नियम: क्रिएटर्सला आता स्पष्टपणे जाहीर करावे लागणार आहे की, तो जो कंटेंट देत आहे, त्या विषयाचा त्याने सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्याला त्याविषयीचे ज्ञान व पदवी मिळालेली आहे.
AI कंटेंटवरही निर्बंध: जर कंटेंट तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर केला असेल, तर त्याची माहिती देणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
जाहिरातींवर प्रतिबंध: माहितीपर कंटेंटच्या आधारावर एखाद्या कंपन्यांची जाहिरात (Advertising) करण्यावरही प्रतिबंध लावण्यात आला आहे.

चीनमधील लोकप्रिय सोशल मीडिया
चीनमध्ये टिकटॉकचे चीनी व्हर्जन Douyin (शॉर्ट व्हिडिओ) सर्वाधिक लोकप्रिय आहे, ज्याचे 700 दशलक्ष युझर्स आहेत. याशिवाय, WeChat (मॅसेजिंग, पेमेंट) चे 1.3 अब्ज मासिक युझर्स आहेत, तर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo (ट्विटरसारखे) चे 600 दशलक्षाहून अधिक युझर्स आहेत.

हेही वाचा - Stunt For Reel : रील बनवण्याच्या नादात गमावला जीव; धावत्या रेल्वेची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू

भारतातही होतेय मागणी
सोशल मीडिया हळूहळू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. इन्फ्लुएन्सरचा सल्ला अनेकांसाठी अंतिम सत्य ठरतो. त्यामुळे, द मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातही अशाच प्रकारच्या अटी आणि शर्तींची गरज व्यक्त होत आहे. उठसूट कॉपी पेस्ट मजकुराच्या आधारावर अनेक इन्फ्लुएन्सर चॅनल्स चालवत आहेत. काही जण वैद्यकीय सल्ले देऊन मोकळे होत आहेत, तर काही जण तंत्र-मंत्राची चुकीची माहिती पसरवत आहेत. अशा लोकांना अटकाव करण्याची मागणी भारतातही होत आहे.


सम्बन्धित सामग्री