Sunday, November 16, 2025 06:46:25 PM

Ziva Dhoni : वडिलांसारखं क्रिकेटर नाही, तर... महेंद्रसिंह धोनीच्या लेकीला 'या' क्षेत्रात करायचंय करिअर

'तू मोठी झाल्यावर काय बनू इच्छितेस?' या प्रश्नावर 10 वर्षांच्या जीवाने कुठल्याही खेळाडूचे किंवा अभिनेत्रीसारखे बनण्याचे नाही, तर एकदम वेगळे आणि खास उत्तर दिले.

ziva dhoni  वडिलांसारखं क्रिकेटर नाही तर महेंद्रसिंह धोनीच्या लेकीला या क्षेत्रात करायचंय करिअर

MS Dhoni's Daughter Ziva Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी यांची मुलगी जीवा धोनी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आता परत एकदा धोनी कुटुंबाचा एक व्हिडिओ चर्चेत आला असून, त्यात माहीची 10 वर्षीय मुलगी जीवाने मोठी झाल्यावर तिचे काय बनण्याचे स्वप्न आहे, याचे निरागसपणे उत्तर दिले आहे.

जीवाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलेलं उत्तर
काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा हरिद्वारला गेल्या होत्या. तिथे श्रीगंगा सभेचे महामंत्री तन्मय वशिष्ठ यांनी जीवाला एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारले, “तू मोठी झाल्यावर काय बनू इच्छितेस?” यावर 10 वर्षांच्या जीवाने कुठल्याही खेळाडूचे किंवा अभिनेत्रीसारखे बनण्याचे नाही, तर एकदम वेगळे आणि खास उत्तर दिले. जीवा निरागसपणे म्हणाली, 'मला 'नेचरलिस्ट' बनायचे आहे.' जीवाचे हे उत्तर ऐकून साक्षी हसली आणि म्हणाली, 'मी आशा करते की ही पुढे जाऊन खरोखरच ते बनो.' जीवाचे हे उत्तर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि तिचे प्रचंड कौतुक होत आहे.

हेही वाचा - Amruta Fadnavis New Song : 'कोई बोले राम राम...'; अमृता फडणवीस यांच्या गाण्यातून श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश

'नेचरलिस्ट' म्हणजे काय?
'नेचरलिस्ट' म्हणजे असा व्यक्ती, जो पर्यावरण, निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम करतो. जीवा म्हणाली की, तिला भविष्यात पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. विशेष बाब म्हणजे, जीवाचे हे स्वप्न तिच्या वडिलांच्या जीवनशैलीशी जुळते आहे. धोनी स्वतःही पर्यावरणाबाबत जागरूक आहे. त्याने रांचीतील आपल्या फार्महाऊसवर सेंद्रिय शेती (Organic Farming) सुरू केली आहे आणि तिथे विविध प्रकारची झाडेही लावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी कुटुंब सध्या निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत असून, त्याचा प्रभाव जीवाच्या विचारांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा - हो, हे खरंय! 'या' देशाच्या मंत्री एकाचवेळी देणार 83 बाळांना जन्म; कसं? वाचा सविस्तर


सम्बन्धित सामग्री