Monday, March 09, 2026 02:50:10 AM

Karmayoga: सूडाच्या आगीत स्वतःला जाळू नका! श्रीकृष्णाचा कर्माचा सिद्धांत आणि काळ करेल प्रत्येक अन्यायाचा हिशोब, फक्त विश्वास ठेवा

श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णाने स्पष्ट केले आहे की, कर्माचे चक्र अत्यंत सूक्ष्म तरीही तितकेच अचूक असते. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देते,...

karmayoga सूडाच्या आगीत स्वतःला जाळू नका श्रीकृष्णाचा कर्माचा सिद्धांत आणि काळ करेल प्रत्येक अन्यायाचा हिशोब फक्त विश्वास ठेवा

Karmayoga by Lord Shri Krishna: जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपल्याला अशा अनुभवांना सामोरे जावे लागते, जिथे आपली निष्पाप वृत्ती किंवा निस्वार्थीपणा पायदळी तुडवला जातो. कोणीतरी आपल्याला रडवते, आपला विश्वासघात करते किंवा शारीरिक-मानसिक छळ करते. अशा वेळी मनात सूडाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला 'कर्मसिद्धांत' अशा परिस्थितीत आपल्याला केवळ धीर देत नाही, तर अन्यायाचा हिशोब कसा पूर्ण होतो, याचे मार्मिक दर्शनही घडवतो.

कर्माचा कधीही न चुकणारा हिशोब
श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णाने स्पष्ट केले आहे की, कर्माचे चक्र अत्यंत सूक्ष्म तरीही तितकेच अचूक असते. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देते, तेव्हा ती प्रत्यक्षात स्वतःच्या कर्माच्या खात्यात 'ऋण' ओढून घेत असते. श्रीकृष्ण म्हणतात की, कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. जर तुमचे कर्म शुद्ध असेल आणि तुम्ही सत्याच्या बाजूने असाल, तर ज्याने तुम्हाला वेदना दिल्या आहेत, त्याला भविष्यात त्याहून अधिक तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. हे सृष्टीचे संतुलन आहे, जे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण राखतात.

सूड घेण्यापेक्षा संयम का महत्त्वाचा?
1. ऊर्जेची बचत: जेव्हा तुम्ही कोणाकडून सूड घेण्याचा विचार करता, तेव्हा तुमची सकारात्मक ऊर्जा सूडाच्या आगीत भस्म होते. त्याऐवजी ती ऊर्जा स्वतःच्या ध्येयप्राप्तीसाठी वापरा. तुमची उत्तुंग प्रगती हाच तुमच्या विरोधकांसाठी सर्वात मोठा 'सूड' असतो.
2. काळाचा न्याय: काळ हा जगातील सर्वात मोठा न्यायमूर्ती आहे. महाभारतात कौरवांनी कितीही अन्याय केला असला, तरी काळाच्या ओघात आणि चुकीच्या कर्मामुळे त्यांचा विनाश अटळ झाला.
3. कर्माचे चक्र: जो इतरांच्या वाटेत काटे पेरतो, त्याला त्याच काट्यांवरून चालावे लागते. हे परमेश्वरी नियम आहे. तुम्ही सूड घेतला तर तुम्हीही त्याच कर्माच्या चक्रात अडकता, त्यापेक्षा तो न्याय भगवंताच्या इच्छेवर सोडावा.

हेही वाचा - Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात भक्तांना मिळणार ही खास सुविधा; 50 हजार भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

मनःशांती मिळवण्यासाठी काय करावे?
कोणी तुमचे मन दुखावले असेल, तर तो अन्याय श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करा. मनात ही भावना ठेवा की, "याचा न्याय आता भगवान करतील." ही भगवंतासमोरील शरणागती तुम्हाला एका क्षणात तणावमुक्त करते. समोरचा वाईट वागतो म्हणून आपणही वाईट वागलो, तर त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही. शक्य असल्यास त्या व्यक्तीला योग्य मार्गाने दंड देण्याचा प्रयास नक्की करावा. यासोबतच स्वतःच्या कर्माची शुद्धता टिकवून ठेवणे हीच खरी साधना आहे. श्रद्धापूर्वक संयम आणि 'सबुरी' बाळगणे हाच भगवंतावर असलेल्या खऱ्या विश्वासाचा पुरावा आहे.

परमेश्वरावर ठेवा अढळ विश्वास
लक्षात ठेवा, श्रीकृष्ण कधीच कोणाचे देणे बाकी ठेवत नाही. जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि तुमच्यावर अन्याय झाला असेल, तर तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी प्रत्यक्ष ईश्वराची असते. नियतीकडून न्याय मिळायला वेळ लागू शकतो किंवा कधीकधी वेळ लागतो आहे, असे आपल्याला वाटते. परंतु, देवाच्या दारात न्याय कधीच नाकारला जात नाही आणि त्याला योग्य वेळही माहीत असते. त्यामुळे मनात सूडाची आग पेटवत ठेवण्यापेक्षा, तो भार श्रीकृष्णावर सोडून आनंदाने आपल्या प्रगतीच्या मार्गावर चालत राहा.

हेही वाचा - Safety Of Tirumala Prasadam: श्रद्धेला तंत्रज्ञानाची जोड; प्रसादातील भेसळ रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, लाडूच्या गुणवत्तेसाठी आता 'ई-नोज' तंत्रज्ञानाचे कवच


सम्बन्धित सामग्री