Asia Cup 2025 Final : गेल्या 41 वर्षांच्या इतिहासात आशिया कप 2025 चा अंतिम (Final) सामना पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धकांमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्व सामने जिंकल्याने त्यांचे पारडे जड आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान कसा-बसा फायनलमध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियासाठी एक छोटी चूकही पराभवाचे कारण ठरू शकते. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) दोन प्रमुख खेळाडूंची चिंता लागली आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचा फॉर्ममध्ये नसणे, ही संघासाठी सर्वात मोठी चिंता आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये सूर्याला अपेक्षेनुसार मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली आणि संयमी कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला होता. कॅप्टनचा फॉर्म संघासाठी मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे.
हेही वाचा - India Vrs Pakistan Final: एशिया कप 2025 फायनल : पावसाने अडथळा आणला तर चषक कोणाचा?
हार्दिक पांड्याही आतापर्यंत निष्प्रभ
टीम इंडियाचा फिनिशर मानला जाणारा हार्दिक पांड्या देखील आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. हार्दिक पांड्या 'कूल' स्टायलिस्ट बनण्याच्या नादात त्याचं खेळणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग विसरला की काय, असा प्रश्न क्रिकेटप्रेमी विचारत आहेत. त्याला यंदाच्या आशिया कपमध्ये म्हणाव्या तशा धावा करता आलेल्या नाहीत.
गोलंदाजीमध्ये त्याने काही महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्याच्या बॉलिंगवर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी धावाही कुटल्या आहेत. त्यामुळे अष्टपैलू हार्दिक पांड्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
हेही वाचा - IND vs PAK Final: फायनलपूर्वी मोठा ट्विस्ट! हस्तांदोलन वादानंतर भारताने पाकिस्तानसोबतची 'ही' परंपरा मोडली
संघासाठी दिलासा देणारे खेळाडू
दरम्यान, टीम इंडियासाठी काही सकारात्मक बाजूही आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा एकटाच पाकिस्तानवर भारी पडू शकतो. शुभमन गिलचा उत्कृष्ट फॉर्म टीम इंडियासाठी मोठा दिलासा आहे. त्याचबरोबर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनीही आपली फलंदाजीची जादू दाखवली आहे, तर शिवम दुबे त्याच्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करत आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची कामगिरी अंतिम सामन्यात निर्णायक ठरणार आहे.