मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सुत्रांनी दिली. दरवाढीचा हाच टक्का मान्य झाल्यास प्रवाशांना आता असलेल्या 100 रुपयांच्या तिकिटामागे 15 रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक असल्याने एस.टी. महामंडळाकडून तिकिट दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एस.टी महामंडळाकडून यापूर्वी 2021 मध्ये तिकिटांमध्ये दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता एस.टी महामंडळाकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सरकारच्या स्थापनेनंतर एस.टी महामंडळाकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर विचार करून तिकिटांमध्ये दरवाढ करण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एस.टी महामंडळाच्या या निर्णयाने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान मतदानावेळी बऱ्याच ठिकाणी एस.टी बसेसची मागणी करण्यात आली होती. परंतु एस.टी महामंडळाच्या देयक रक्कमेची थकबाकी आहे.