Thursday, September 12, 2024 11:18:54 AM

MSRTC
एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच

पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरू आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच

मुंबई : पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. औद्योगिक न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. कामावर रुजू होणाऱ्यांना अटकाव करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

राज्य परिवहनमध्ये सक्रीय असलेल्या ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या २५१ पैकी बहुसंख्य आगारांमध्ये कामकाज बंद होते. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कर्मचाऱ्यांची पगाराची मागणी पूर्ण करावी, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली आहे. खोत आणि पडळकरांच्या पाठिंब्यामुळे आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

पगारवाढ मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याची भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. संघटनांच्या प्रतिनिधींसोबत केलेली चर्चा अयशस्वी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सणासुदीत नागरिकांना त्रास होऊ यासाठी संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. चर्चेत सुरुवातीला अपयश आले तरी तोडगा काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू, असे संकेत एसटी महामंडळाकडून देण्यात आले.

एसटीचा संप सुरू असल्यामुळे खासगी वाहतूकदारांनी त्यांच्या वाहतूक दरात अव्वाच्यासव्वा वाढ केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना या दरवाढीचा फटका बसत आहे. 

           

सम्बन्धित सामग्री