पुणे : पुण्यातील पोर्शे वाहन अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांची चार तास चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांनी आमदार टिंगरेंची चार तास चौकशी करण्यात आली. या चौकशीबाबत तपशील अद्याप हाती आलेले नाहीत.
पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर थोड्याच वेळात टिंगरे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला असा आरोप करण्यात आला होता. हा आरोप टिंगरेंनी फेटाळला. पण राजकीय विरोधकांनी टिंगरेंच्या चौकशीची मागणी केली होती. अखेर टिंगरेंची पुणे पोलिसांनी सुमारे चार तास कसून चौकशी केली.