Tuesday, December 10, 2024 10:40:17 AM

Supriya Sule
'टिंगरेंनीच नोटीस पाठवली'

टिंगरेंनीच शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. त्यांनी एक कागद दाखवत ही टिंगरेंनीच पाठवलेली नोटीस असल्याचे सांगितले.

टिंगरेंनीच नोटीस पाठवली

बारामती : शरद पवारांना नोटीस पाठवली नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले उमेदवार सुनिल टिंगरे करत आहेत. तर टिंगरेंनीच शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. त्यांनी एक कागद दाखवत ही टिंगरेंनीच पाठवलेली नोटीस असल्याचे सांगितले.

लोकसभेच्या सदस्य असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा खासदार धनंजय महाडिक यांच्यावर कडाडून टीका केली. बहिणींना दमदाटी करणाऱ्या धनंजय महाडिक यांच्याविरोधात निवडणूक आयोग आणि महिला आयोग यांनी कारवाई करावी. महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा; अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

कोण आहेत सुनिल टिंगरे ?

पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप टिंगरेंवर झाला होता. हा आरोप टिंगरेंनी फेटाळला होता. याच प्रकरणामुळे टिंगरेंना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न चर्चेत होता. अखेर टिंगरेंना उमेदवारी जाहीर झाली आणि हा प्रश्न मागे पडला. आता प्रचार काळात टिंगरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली असा आरोप लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पण हा आरोप सुनिल टिंगरे यांनी फेटाळला. तर टिंगरेंनीच शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. 

महाडिकांचे वक्तव्य

लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन विरोधकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांचे फोटो काढा आणि त्यांची नावं लिहून घ्या; अशा स्वरुपाचे वक्तव्य भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. हे वक्तव्य महाडिकांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने या वक्तव्याप्रकरणी धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली आहे. तातडीने खुलासा मागितला आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo