Surya Grahan 2026 : खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. हे ग्रहण 'कंकणाकृती' (Annular Solar Eclipse) स्वरूपाचे असून, विज्ञानाच्या भाषेत याला 'रिंग ऑफ फायर' (Ring of Fire) असेही म्हटले जाते. या सूर्यग्रहणाची वेळ, सूतक काळ आणि तुमच्या राशीवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती या बातमीमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
सूर्यग्रहणाची वेळ आणि तिथी
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळवारी लागणार आहे. भारतीय पंचांगानुसार, हे ग्रहण फाल्गुन महिन्यातील अमावास्येला असेल.
- ग्रहणाची सुरुवात: दुपारी 03:26 वाजता.
- ग्रहणाचा मध्य: संध्याकाळी 05:42 वाजता.
- ग्रहणाची समाप्ती: रात्री 07:57 वाजता. हे ग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात लागणार असल्याने ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतात सूतक काळ लागेल का?
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो, ज्यामध्ये शुभ कार्ये वर्जित असतात. परंतु, 17 फेब्रुवारीचे हे सूर्यग्रहण भारतात कोठेही दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूतक काळ मान्य नसेल. येथील मंदिरे उघडी राहतील आणि दैनंदिन पूजाविधी किंवा शुभ कार्यांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.
हे ग्रहण कोठे दिसणार?
हे कंकणाकृती सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, अंटार्कटिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे. अर्जेंटिना, चिली, झिम्बाब्वे, नामीबिया आणि मॉरिशस यांसारख्या देशांमध्ये 'रिंग ऑफ फायर'चा अद्भुत नजारा पाहायला मिळेल. भारतात हे ग्रहण दृश्यमान होणार नसल्याने खगोलप्रेमींना त्याच्या फोटो आणि व्हिडिओवरच समाधान मानावे लागेल.
हेही वाचा - Mahashivratri 2026 : या महाशिवरात्रीला 300 वर्षांनी महासंयोग! अनेक शुभ योगांचा दुर्मीळ मिलाप 'या' 3 राशींसाठी उघडणार 'कुबेराचा खजिना'
सूर्यग्रहणाचा 12 राशींवर होणारा परिणाम (Surya Grahan Rashifal)
ग्रहणाचा प्रभाव थेट दिसत नसला तरी ज्योतिषीय दृष्टीने राशींवर त्याचे परिणाम खालीलप्रमाणे असतील:
मेष: रखडलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये यश मिळेल.
वृषभ: नोकरीत बदल आणि प्रगतीचे योग आहेत.
मिथुन: आर्थिक समस्या जाणवू शकतात, वाहन जपून चालवा.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, महत्त्वाची कामे लांबणीवर पडू शकतात.
सिंह: कौटुंबिक आणि करिअरमध्ये अडचणी येण्याची शक्यता.
कन्या: कामातील अडथळे दूर होतील, प्रकृतीत सुधारणा होईल.
तूळ: कौटुंबिक तणाव आणि आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.
वृश्चिक: करिअरमध्ये निष्काळजीपणा करू नका, प्रकृतीकडे लक्ष द्या.
धनु: नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ चांगला आहे, मानसिक शांती मिळेल.
मकर: नोकरीत समस्या येऊ शकतात किंवा स्थान बदल होऊ शकतो.
कुंभ: (स्वतःच्या राशीत ग्रहण) घाईत निर्णय घेऊ नका, आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.
मीन: वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता; अपघातांपासून सावध राहा.
अशुभ प्रभाव टाळण्यासाठी उपाय
ज्या राशींवर या ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव आहे, त्यांनी ग्रहण काळात सूर्य देव किंवा भगवान शिव यांच्या मंत्रांचा (उदा. ॐ नमः शिवाय) जप करावा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे देखील फलदायी ठरते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून सूर्य देवाशी संबंधित वस्तू जसे की गहू, तांबे किंवा गूळ यांचे दान करावे.
हेही वाचा - Bhimashankar Jyotirlinga Temple: यंदाच्या महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले राहणार? समोर आली मोठी अपडेट
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)