Tuesday, December 10, 2024 09:40:41 AM

Swapna Patker
स्वप्ना पाटकर निवडणूक लढणार, ठाकरे सेनेला आव्हान देणार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

स्वप्ना पाटकर निवडणूक लढणार ठाकरे सेनेला आव्हान देणार

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. स्वप्ना पाटकर अपक्ष उमेदवार म्हणून संजय राऊत यांचे धाकटे बंधू सुनील राऊत यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी स्वप्ना पाटकर यांनी विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुनील राऊत यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आहे. पण स्वप्ना राऊत निवडणूक रिंगणात उतरल्या तर सुनील राऊत यांच्यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo