Thursday, November 13, 2025 08:30:10 AM

Women in Heavy Works : या राज्याचा मोठा निर्णय! ‘कारखान्यांतील धोकादायक कामांमध्ये’ आता महिलाही दिसणार; नियमांमध्ये होणार बदल

सध्या तामिळनाडूमध्ये महिला काही जोखीमपूर्ण कामे जसे की समुद्री शेवाळ (Seaweed) कापणे आणि मासेमारी यांसारख्या कामांमध्ये अगोदरपासूनच सहभागी आहेत. आता त्यांना आणखी काही कामांची परवानगी मिळणार आहे.

women in heavy works  या राज्याचा मोठा निर्णय ‘कारखान्यांतील धोकादायक कामांमध्ये’ आता महिलाही दिसणार नियमांमध्ये होणार बदल

चेन्नई : महिलांना समान हक्क देण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने तामिळनाडू कारखाना नियम, 1950 मध्ये बदल केले आहेत. या बदलांमुळे आता महिलांना 'धोकादायक' मानल्या गेलेल्या जवळपास 20 प्रकारची कामे करण्याची परवानगी मिळणार आहे, ज्या कामांपासून त्यांना आतापर्यंत वंचित ठेवले जात होते. याशिवाय, जर महिला कर्मचाऱ्याला नाईट शिफ्ट (रात्रीची शिफ्ट) करायची असेल, तर तिची लिखित संमती घेणे बंधनकारक असेल, अशा नियमातही बदल करण्याचा प्रस्ताव आहे.

धोकादायक कामांच्या यादीत कोणती कामे?
कामगार कल्याण आणि कौशल्य विकास विभागाने गेल्या महिन्यात तामिळनाडू कारखाना नियमांमध्ये सुधारणांच्या मसुद्याची अधिसूचना जारी केली होती. या बदलांमध्ये महिलांना ज्या धोकादायक कामांमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे, त्यात इलेक्ट्रोलिटिक प्रक्रिया, शिसे (Lead) प्रक्रिया, काच (Glass) उत्पादन, शिसे (Lead) ची निर्मिती किंवा प्रक्रिया यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Fuel Leak in Indigo Flight: कोलकाता-श्रीनगर इंडिगो फ्लाइटमध्ये इंधन गळती; वाराणसीत आपत्कालीन लँडिंग

याशिवाय, धोकादायक वायू आणि पेट्रोलियम उत्पादन, ब्लास्टिंग, कच्चे चामडे आणि कातडीला चुना लावणे व रंगवणे, ग्रेफाइट पावडरिंग, सीसा सामग्रीपासून बनवलेली प्रिंटिंग प्रेस, काजू प्रक्रिया, कॉयर आणि फायबर कारखान्यांमध्ये चटई आणि गालिचे रंगवणे, स्टेंसिलिंग, पेंटिंग आणि मातीची भांडी बनवणे यांसारख्या कामांच्या यादीत आता महिलांना काम करण्याची परवानगी मिळणार आहे.

आरोग्य आणि सुरक्षिततेचा धोका
सध्या तामिळनाडूमध्ये महिला काही जोखीमपूर्ण कामे जसे की समुद्री शेवाळ (Seaweed) कापणे आणि मासेमारी यांसारख्या कामांमध्ये अगोदरपासूनच सहभागी आहेत. आता त्यांना मोठ्या आवाजात आणि हाय-व्हायब्रेशनमध्ये काम करण्याचीही परवानगी दिली जाणार आहे, म्हणजेच त्यांना विषारी वायू, पेट्रोलियम आणि केमिकल्सशी संबंधित कामे करावी लागणार आहेत. परंतु, या बदलांचे काही नुकसान देखील आहेत; उदाहरणार्थ समुद्री शेवाळ कापताना जखमी होण्याचा धोका, मासेमारीमुळे आजारी पडण्याची भीती आणि कारखान्यांमधील धोकादायक वस्तूंमुळे होणाऱ्या आरोग्य समस्या महिलांना भेडसावू शकतात. सरकारने या नियमांमध्ये गर्भवती महिला कामगारांना या धोकादायक कामांमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्याची सुधारणा करण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा - Niraj Chopra: ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय लष्करात ‘सन्माननीय लेफ्टनंट कर्नल’; देशाचा अभिमान पुन्हा उंचावला


सम्बन्धित सामग्री