Tuesday, December 10, 2024 11:51:39 AM

Tanuja Gholap
देवळालीतून तनुजा घोलप यांची माघार

नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली.

देवळालीतून तनुजा घोलप यांची माघार

देवळाली : नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली. तनुजा घोलप या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या आहेत. 

तनुजा घोलप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे घोलप कुटुंबात कौटुंबिक कलह सुरू झाला होता. निवडणूक लढवणार असल्यास माझ्या नावाचा  वापर करू नये, अशा स्वरुपाची जाहीर नोटीस बबराव घोलप यांनी काढली. ही नोटीस आल्यानंतर तनुजा घोलप यांनी माघारीचा निर्णय घेतला. देवळालीत शिवसेनेच्या तिकिटावर बबनराव घोलप तर ठाकरे सेनेकडून घोलपपुत्र योगेश घोलप हे दोघे निवडणूक रिंगणात आहेत.

जरांगे समर्थकाची माघार

जरांगे समर्थक करण गायकरांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली. जरांगेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर ही माघार झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo