Tuesday, November 18, 2025 03:41:39 AM

Rinku Singh Threat: टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी; 5 कोटी रुपयांची मागणी

या धमकीमागे दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी टोळीचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

rinku singh threat टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी 5 कोटी रुपयांची मागणी

Rinku Singh Threat : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या धमकीमागे दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी टोळीचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

5 कोटी रुपयांची खंडणी मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू सिंगला या वर्षी तीन वेळा धमकीचे संदेश मिळाले. या संदेशांमध्ये आरोपींनी 5 कोटींची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद या दोन व्यक्तींना वेस्ट इंडिजमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांनी चौकशीत धमक्या दिल्याची कबुली दिली आहे.

धमकीचे तीन मेसेज
पहिला संदेश 5 फेब्रुवारी रोजी रिंकू सिंगला पाठवण्यात आला होता. आरोपी नवीदने त्यात स्वतःला तुमचा मोठा चाहता म्हणून ओळख देत आर्थिक मदतीची मागणी केली होती. दुसरा संदेश 9 एप्रिल रोजी आला, ज्यात स्पष्टपणे लिहिले होते, मला 5 कोटी हवे आहेत, ठिकाण आणि वेळ मी ठरवेन. या धमकीनंतरही रिंकू सिंगने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तथापी, तिसरा आणि अंतिम संदेश आणखी धक्कादायक होता. 

हेही वाचा - Two stands at Vizag Stadium : अभिमानास्पद! विझाग स्टेडियममधील दोन स्टँडना देणार मिताली राज आणि रवी कल्पना यांचे नाव

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात गंभीर गुन्ह्यांच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, दाऊद टोळीशी त्यांचा नेमका संपर्क कसा प्रस्थापित झाला याची माहिती मिळवण्यावर भर दिला जात आहे. या घटनेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस सूत्रांच्या मते, रिंकू सिंगच्या सुरक्षेत तात्पुरती वाढ करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास उच्च पातळीवर चालू आहे.

हेही वाचा - Rohit Sharma: कर्णधारपद गमावल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला, 'मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध

रिंकू सिंगची आशिया कपमधील कामगिरी
रिंकू सिंग नुकताच आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. या मालिकेत त्याला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. अंतिम सामन्यात त्याने टीम इंडियासाठी विजयी चौकार मारत सामना जिंकून दिला होता. 


सम्बन्धित सामग्री