Raghopur Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत राघोपूर मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी अतिशय चुरशीच्या लढतीनंतर विजय मिळवत भाजप उमेदवार सतीश कुमार यांचा पराभव केला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तेजस्वी पिछाडीवर होते, परंतु अंतिम फेरीत त्यांनी तब्बल 10 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली. तेजस्वींना एकूण 1 लाखापेक्षा जास्त मते मिळाली. राघोपूरमध्ये अपक्ष बळीराम सिंह तिसऱ्या स्थानी राहिले. जनसुराजचे उमेदवार चंचल कुमार तर तीन आकडी मतांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. तसेच, तेजप्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाचे उमेदवार प्रेम कुमार यांना एक हजार मते देखील मिळाली नाहीत.
एनडीएला पुन्हा स्पष्ट बहुमत
या निवडणुकीत एनडीएने पुन्हा एकदा मजबूत कामगिरी करत बहुमत मिळवलं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार:
भाजप – 87 जागांवर आघाडी
जेडीयू – 79 जागांवर आघाडी
एलजेपी (रामविलास) – 21 जागा
एचएएम – 5 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा – 3 जागा
एकूणचं एनडीएने 200 चा टप्पा पार करत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे.
हेही वाचा - Bihar Election Result 2025: बिहारमध्ये 'या' योजनेमुळे बदलला संपूर्ण गेम! नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार?
अमित मालवीय यांचा राहुल गांधींवर निशाणा
दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. मालवीय यांनी ‘एक्स’ वर लिहिले, 'राहुल गांधी! आणखी एक निवडणूक आणि आणखी एक पराभव. सलग अपयशाची अशी मालिका कुणाकडे असेल तर ते फक्त त्यांच्याकडेच. अपयशी ठरण्यातसुद्धा अशी सातत्यपूर्ण कामगिरी दुर्मिळच म्हणावी लागेल.'
हेही वाचा - PM Modi on Bihar Result : बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; जनतेचे आभार मानत दिले 'हे' आश्वासन
दरम्यान, तेजस्वी यादवांनी राघोपूर मतदारसंघात आपला गड राखला. तथापी, राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार सत्तेत परत येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राजकीय दिग्गजांची पास-फेल यादीही आता समोर येत असून, पुढील काही तासांत संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहेत.