हैदराबाद : तेलंगणमधील हैदराबादमध्ये एक दुःखद घटना घडली. शाळेच्या मधल्या सुटीत डबा खातेवेळी सहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण पुऱ्या खाणे एवढेच होते, अशी माहिती मिळाली आहे.
विद्यार्थाने मधल्या सुटीत डबा उघडला. डब्यात पुऱ्या होत्या. पुऱ्या बघून खूश झालेल्या मुलाने एकदम तीन पुऱ्या हाती घेतल्या पटकन तोंडात टाकल्या. एकदम तीन पुऱ्या खाणे मुलाच्या जीवावर बेतले. पुऱ्या घशात अडकल्यामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. थोड्याच वेळात मुलगा बेशुद्ध पडला. वर्गात असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षक घाबरले. त्यांनी तातडीने मुलाला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलाला तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर शाळा प्रशासनाने मुलाच्या पालकांना माहिती दिली. पालकांना घटनेची माहिती मिळताच धक्का बसला. त्यांनी बेगमपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाने मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. एकदम तीन पुऱ्या खाण्याच्या प्रयत्नात मुलाने संकट ओढवून घेतले. पुऱ्या घशात अडकल्या. यामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. थोड्याच वेळात मुलगा बेशुद्ध पडला. उपचार सुरू होण्याआधीच मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला. वैद्यकीय पथकाने मुलाच्या घशातून पुऱ्या काढल्या. पण तोपर्यंत उशीर झाला होता.