Saturday, January 25, 2025 07:27:36 AM

Mumbai
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात

मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये शनिवार ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये शनिवार ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. दुरुस्तीचे काम रविवार ०१ डिसेंबर २०२४ ते सोमवार ०२ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुरू राहणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे तसेच भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे रविवार ०१ डिसेंबर २०२४ ते गुरुवार ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

मुंबईला सात धरणांतून दररोज एकूण 3.4 अब्ज लिटर पाण्याचे वितरण केले. या पाणीपुरवठ्यात रविवार ०१ डिसेंबर २०२४ ते गुरुवार ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणे / तलाव

  1. विहार तलाव - 25 हजार 698 दशलक्ष लिटर
  2. तुळशी तलाव - 8 हजार 046 दशलक्ष लिटर
  3. तानसा तलाव - 1 लाख 45 हजार 080 दशलक्ष लिटर
  4. मोडक सागर (लोअर वैतरणा) - 1 लाख 28 हजार 925 दशलक्ष लिटर
  5. अप्पर वैतरणा - 2 लाख 27 हजार 047 दशलक्ष लिटर
  6. भातसा - 7 लाख 17 हजार 037 दशलक्ष लिटर
  7. मध्य वैतरणा - 1 लाख 93 हजार 530 दशलक्ष लिटर

सम्बन्धित सामग्री